Thursday, April 14, 2016

🌿श्रीराम जन्माचे अभंग 🌿
क्रमांकः३
येतसे दशरथ सुमित्रा मंदिरीं।देखतां सामोरी येती झालीं।।१।।न माये आनंद तियेचें मानसीं।ठेवी मस्तकासी चरणावरी।।२।।घालोनी आसन प्रक्षाळी चरण।सर्वांगी लेपन तीर्थोदकें।।३।।गंध धूप दीप पुष्पांचिया माळा।अर्पूनि तांबुला उभी राहे।।४।।कैकयीचें दुःख विसरला राव।पाहुनियां भाव सुमित्रेचा।।५।।होती जे डोहाळे तुझिये मानसीं।सांग मजपासीं पतिव्रते।।६।।प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा।वडिलांची सेवा अहर्निशी।।७।।आवडे हें एक नावडे आणिक।द्यावें मज एक हेचि आतां।।८।।ऐकतांची ऐसें कांतेंचें वचन।आनंदे निमग्न मन होय।।९।।घेऊनिया हातीं रत्नाचें भूषण।टाकी ओवाळून नामा म्हणे।।१०।।
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻

No comments: