Thursday, April 14, 2016

🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें।
भूतें झडपिलें निश्चयेंसी॥
माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन।
म्हणोनियां विघ्न ओढवलें॥
निवारीं हें दु:ख वैकुंठनायका।
रक्षीं या बाळका सुदर्शनें॥
तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा।
द्यावी मज भिक्षा हेंचि आतां॥
नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं।
नेत्र उघडोनि पाहती झाली॥
राजा म्हणे काहों ऐसी हे अवस्था।
कांहो भ्रम चित्ता झाला असे॥
विश्वाचा मी आत्मा स्वयें असें राम।
मजमाजी भ्रम कैंचा असे॥
अवतार महिमा वाणी वेद माझा।
सुरवरांच्या काजा नामा म्हणे॥🚩
॥श्रीराम जय राम जय जय राम॥

No comments: